स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचा विवाह निश्चित
 
					
    मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू विवाहबंधनात अडकणार आहे. ती हैदराबादमध्ये राहणाऱ्या व्यंकट दत्ता साईसोबत २२ डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. व्यंकट हे पॉसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत.
सिंधूचे वडील पीव्ही रमण यांनी सोमवारी रात्री लखनऊमध्ये सांगितले – ‘दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत होते, परंतु सर्व काही एक महिन्यापूर्वीच ठरले होते. ही एकमेव वेळ होती कारण जानेवारीपासून तिचे (सिंधूचे) वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे.
सिंधूच्या वडिलांनी सांगितले की, ‘त्यामुळेच दोन्ही कुटुंबांनी 22 डिसेंबरला लग्नसोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. 24 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. ती लवकरच तिची ट्रेनिंग सुरू करणार आहे, कारण पुढचा सीझन खूप महत्त्वाचा असणार आहे. 20 डिसेंबरपासून लग्नाशी संबंधित कार्यक्रम सुरू होतील.
 
                             
                                     
                                    