अकोल्यातील ‘हिंदुत्वा’ चा चेहरा हरपला !
अकोला, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील कट्टर स्वातंत्र्यवीर सावरकर सावरकर भक्त आणि ‘हिंदू सेना’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, हिंदू धर्म तथा संस्कृतीसाठी समर्पित साप्ताहिक ‘जागे व्हा सावधान’ चे संस्थापक संपादक आणि हिंदू ज्ञानपीठ शाळेचे संस्थापक धर्मवीर उपाधीने सन्मानित गुरु चंद्रशेखर गाडगीळ यांचे आज निधन झाले . त्यांचे वय ९० वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा संग्राम गाडगीळ, सून, नात नातवंडांसह मोठे आप्त कुटुंब आहे. अलिकडच्या काही वर्षांपासून गुरू गाडगीळ वयोमानाने थकल्याने त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली होती.
ML/ML/PGB 1 Dec 2024