राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघात होणार फेर मतमोजणी

 राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघात होणार फेर मतमोजणी

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधानसभा निवडणूकीत मतदान प्रक्रीयेबाबत महाविकास आघाडीकडून शंका उपस्थिक करत राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच आज निवडणूक आयोगाने राज्यातील एका मतदार संघात मतांची फेर मोजणी करण्यास मान्यता दिली आहे. नाशिक पश्चिम मतदार संघात पुन्हा फेर मतमोजणी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केली होती. त्यांची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. त्यासंदर्भातील पत्र नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्याने सुधाकर बडगुजर यांना दिले आहे.

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या असणाऱ्या नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या उमेदवार सीमा हिरे विजयी झाल्या आहेत. त्यांना १ लाख ४१ हजार ७२५ मते मिळाली असून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा हिरे यांनी ६८ हजार १७७ मतांनी पराभव करत हॅटट्रिक साधली. बडगुजरांना ७३ हजार ५४८ मते मिळाली आहेत. मनसेचे दिनकर पाटील यांना ४६ हजार ६४९ मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या निकालानंतर राज्यातील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा तसेच हॅक केल्याचा आरोप करत फेर मतमोजणीची मागणी केली जाऊ लागली आहे. अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावाने देखील मतदान झाल्याचा दावा परळीसह अनेक मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी फेर मतमोजणी मागणी केली होती. ती मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.

SL/ML/SL

27 Nov. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *