स्त्रियांसाठी स्वत: च घर सुरक्षित आहे का? UN चा अहवाल काय सांगतो वाचा!

महिला हिंसाचारविरोधी आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधत UN म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या युएन वुमेन आणि युएन ऑफिस ऑफ ड्रग्ज ॲंड क्राईम या दोन संस्थांनी सर्वेक्षण केले. जगभरातल्या महिलांचा त्यांनी अभ्यास केला. त्या अभ्यानुसार काढलेल्या अहवालात जगात दररोज १४० महिला व मुलींची त्यांच्या घरीच जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्याकडून हत्या करण्यात येत असल्याचा दावा यात केला आहे. त्यामुळे महिला व मुलींसाठी स्वत:च घरच असुरक्षित असल्याचे यातून निदर्शनास आले आहे. महिला हिंसाचारविरोधी आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधत हा अहवाल प्रकाशित करण्यात आला.