Trumpet ने केला तुतारीचा घात, नऊ उमेदवार पाडले

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूकांमध्ये प्रतीपक्षाला मात देण्यासाठी अनेक क्लृप्ता लढवल्या जातात. एकाच नावाचे अनेक उमेदवार असणे, निवडणूक चिन्हामध्ये साधर्म्य ठेवणे यातून मतदारांनांनी संभ्रमीत करण्याचा प्रयत्न केला जातो. लोकसभेप्रमाणे विधानसभेला चिन्हाच्या घोळामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. यंदाही मतदारांचं तुतारी आणि ट्रेम्पेट या चिन्हांमध्ये मतदारांचं कन्फ्यूजन झालं. त्यामुळे जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव पारनेर, केज, परांडा या नऊ मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार पडले. या उमेदवारांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला, त्यापेक्षा जास्त मते ही पिपाणीला मिळाल्याचे पाहायला मिळाले.
या निवडणुकीत काँग्रेसला 16, उद्धव ठाकरे गटाला 20, शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीत ठाकरे गट सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
या निवडणूकीत ट्रेम्पेट Trumpet या चिन्हाने तुतारीवर कशी मात केली हे पुढील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
जिंतूर (परभणी)
विजय भांबळे – राष्ट्रवादी (सपा)
4516 मतांनी पराभूत
Trumpet चिन्हाला मिळालेली मते – 7430 मते
विजेता
मेघना बोर्डीकर (भाजप)
धनसावंगी (जालना)
राजेश टोपे – राष्ट्रवादी (सपा)
2309 मतांनी पराभूत
Trumpet चिन्हाला मिळालेली मते 4830
विजेता
हिकमत उधान (शिंदेसेना)
शहापूर (ठाणे)
पांडुरंग बरोरा – राष्ट्रवादी (सपा)
1672 मतांनी पराभूत
Trumpet चिन्हाला मिळालेली मते 3892 मते
विजेता दौलत दरोडा (AP)
बेलापूर (ठाणे)
संदीप नाईक – राष्ट्रवादी (सपा)
377 मतांनी पराभूत
Trumpet चिन्हाला मिळालेली मते 2860
विजेता
मंदा म्हात्रे (भाजप)
अनुशक्तीनगर (मुंबई)
फहाद अहमद – राष्ट्रवादी (एसपी)
3378 मतांनी पराभूत
Trumpet चिन्हाला मिळालेली मते 4075
विजेता
सना मलिक – राष्ट्रवादी (एपी)
आंबेगाव (पुणे)
देवदत्त निकम – राष्ट्रवादी (एपी)
1523 मतांनी पराभूत
Trumpet चिन्हाला मिळालेली मते 2965 मते
विजेता
दिलीप वळसे पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस
पारनेर (अहिल्यानगर)
राणी लंके – राष्ट्रवादी (सपा)
1526 मतांनी पराभूत
Trumpet चिन्हाला मिळालेली मते 3582 मते
विजेता
काशिनाथ दाते – राष्ट्रवादी (एपी)
केज (बीड)
पृथ्वीराज साठे – राष्ट्रवादी (सपा)
2687 मतांनी पराभूत
Trumpet चिन्हाला मिळालेली मते 3559
विजेता
नमिता मुंदडा (भाजप)
परंडा (धाराशिव)
राहुल मोटे – राष्ट्रवादी (सपा)
1509 मतांनी पराभूत
विजेता
तानाजी सावंत शिवसेना (शिंदे)
SL/ML/SL
25 Nov. 2024