सेबीने अदानी समूहाकडून मागवले स्पष्टीकरण
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाचखोरीच्या आरोपावरून अमेरिकन न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर भारतातील अदानी समूहाच्या अडचणी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. बाजार नियामक सेबी अदानी समूहाने बाजारावर प्रभाव टाकणारी माहिती उघड करण्याच्या नियमांचे उल्लंघन केले आहे का? याबाबत तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे. सेबीने अदानी समूहाकडून स्पष्टीकरण मागवले आहे. सेबीने केनियातील विमानतळ विस्तारीकरणाचा करार रद्द करणे आणि अमेरिकेतील प्रकरणाबाबत उत्तरे मागवली आहेत. मात्र, समूहाने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेबीने स्टॉक एक्सचेंजच्या अधिकाऱ्यांकडूनही माहिती मागवली आहे. त्यात अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड लाचखोरीच्या आरोपांबाबत यूएस न्याय विभागाच्या तपासाला पुरेसा प्रतिसाद देण्यात अयशस्वी ठरली का, असे विचारण्यात आले आहे. वस्तुस्थितीचा तपास दोन आठवडे टिकू शकतो. यानंतर औपचारिक तपास सुरू करायचा की नाही हे सेबी ठरवेल.
हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांवर सेबीने अदानी समूहाचीही चौकशी केल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप त्याचे निकाल जाहीर केलेले नाहीत. दरम्यान, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या करीन जीन-पियरे यांनी अदानी यांच्यावरील आरोपांची माहिती असल्याचे सांगितले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचा विचार केला तर दोन्ही देशांमधील संबंध मजबूत आहेत.
SL/ML/SL
23 Nov. 2024