सरकार स्थापनेनंतर मराठा आरक्षणासाठी सामुहिक उपोषण
जालना, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. राज्यातले मराठे अंतरवाली सराटीत येणार असून सामुहिक आमरण उपोषण होणार असं जरांगे म्हणाले. देशात कधी इतकं मोठं आमरण उपोषण झालं नसेल, तितकं मोठं उपोषण अंतरवाली मध्ये होणार असल्याचंही जरांगे म्हणाले.
एका ठिकाणी, एका जागेवर आणि एकाच वेळास हे सामुहिक आमरण उपोषण होणार असल्याची माहिती मनोज जरांगेंनी माध्यमांशी बोलतांना दिली. सरकार कोणाचं ही येऊ द्या, मराठे उपोषणाला बसले की सरकार गुढग्यावर टेकवलं म्हणून समजायचं असा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे.
ML/ML/SL
22 Nov. 2024