दिल्लीत ई-कॉमर्स कंपन्यांना फटाक्यांची विक्री त्वरित थांबवण्याचे निर्देश

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळा सुरू होताच दरवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील राजधानी दिल्लीतील प्रदुषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून आता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
दिल्ली पोलिसांनी ई-कॉमर्स कंपन्यांना राजधानीत ऑनलाइन फटाक्यांची विक्री त्वरित थांबवण्यास सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी (20 नोव्हेंबर) ई-कॉमर्स कंपन्यांना ई-मेल केले. सर्वोच्च न्यायालयाच्या 11 नोव्हेंबरच्या आदेशामुळे दिल्ली पोलिसांनी हा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एमसी मेहता विरुद्ध भारत सरकार या खटल्यात प्रदूषणाचा सामना करण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालावी, असे निर्देश दिले होते.
दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती गंभीर आहे. पाच दिवसांनंतर, आज दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 400 च्या खाली आला. 379 नोंदवले गेले. 300-500 मधील AQI गंभीर मानला जातो. दोन दिवसांपूर्वीच न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्लीतील सर्व शाळा ठेवण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय राजधानीत श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजना-4 (GRAP-4) लागू आहे. बारावीपर्यंतचे सर्व वर्ग ऑनलाइन करण्यात आले आहेत.
SL/ML/SL
21 Nov. 2024