संगीतकार ए.आर. रेहमान व सायरा बानू यांचा लग्नानंतर २९ वर्षांनी मोठा निर्णय
संगीतकार ए.आर. रेहमान व सायरा बानू यांचा घटस्फोट, लग्नानंतर २९ वर्षांनी घेतला निर्णय D: प्रसिद्ध संगीतकार, गायक आणि ऑस्कर विजेते ए. आर. रहमान हे वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. संगीतकार ए आर रेहमान आणि सायरा बानू यांनी वैवाहिक जीवनात एकमेकांपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. २९ वर्षांच्या संसारानंतर हे दोघंही घटस्फोट घेणार आहेत. हा निर्णय त्यांच्या नात्यातील भावनिक तणावानंतर घेण्यात आला आहे. ए आर रेहमान आणि सायरा यांचा निकाह १९९५ मध्ये झाला होता. या जोडप्याला खतिजा, रहीमा आणि आमीन अशी तीन मुले आहेत.