लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला अमेरिकेतून अटक

कॅलिफोर्निया, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल याला अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप या प्रकरणात मुंबई किंवा दिल्ली पोलिसांचं कोणतंही अधिकृत स्टेटमेंट समोर आलेलं नाहीये. मात्र सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे दोन आठवड्यांपूर्वीच गँगस्टर अनमोल बिश्नोईविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आलं होतं.
अनमोलवर सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणीही अनमोलचे नाव पुढे आले होते. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याची जबाबदारी अनमोलने घेतली होती. यासोबतच पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला आणि बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातही त्याचे नाव समोर आले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दसऱ्याच्या दिवशी तीन हल्लेखोरांनी त्यांच्या हल्ला कोला होता. त्यातील दोघांना पोलिसांनी तातडीनं पकडं तर मुख्य हल्लेखोर फरार झाला होता, त्यानंतर त्याला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणात देखील बिश्नोई गँगच कनेक्शन समोर आलं होतं. अखेर आता अनमोल बिश्नोईल अटक करण्यात आली आहे, त्याच्या अटकेनंतर काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
SL/ML/SL
18 Nov. 2024