अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, थोडक्यात बचावली
कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा शाह हिचा सोमवारी अपघात झाला आहे. तिने इन्स्टाग्रामवर अपघाताची माहिती दिली आहे. कश्मीराने इन्स्टाग्रामवर रक्ताने माखलेला एक फोटो शेअर केला आहे.
कश्मीराने कारच्या सीटचा एक फोटो पोस्ट केला आहे. या सीटवर रक्ताने माखलेले कपडे व टिश्यू दिसत आहेत. हा फोटो शेअर करून कश्मीराने तिच्या अपघाताची माहिती दिली. कश्मीरा अपघातातून थोडक्यात बचावली आहे. काहीतरी मोठं होणार होतं पण वाचले, असं कश्मीराने म्हटलं आहे.कश्मीरा शाह सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे. तर तिची मुलं क्रिशांग व रेयान ही कृष्णा अभिषेकबरोबर मुंबईत आहेत. परदेशातच कश्मीराचा अपघात झाला आहे.