भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा झाली दुबई स्पोर्ट्स अॅम्बेसेडर
 
					
    मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताची निवृत्ती टेनिसपटू सानिया मिर्झाच्या कामगिरीचे जगभरात कौतुक केले जाते. आता तिला मोठा सन्मान आणि जबाबदारी मिळाली आहे. सानिया मिर्झा १२ नोव्हेंबर रोजी दुबई स्पोर्ट्स रिट्रीट नावाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती, जिथे तिची दुबई स्पोर्ट्स ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासोबतच भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह याचीही दुबई स्पोर्ट्स अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. दुबईत आयोजित एका महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाच्य माध्यमातून या दोन्ही माजी खेळाडूंच्या योगदानबद्दल सांगण्यात आले.
सानिया मिर्झाची दुबई स्पोर्ट्स ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चाहते तिचे अभिनंदन करत आहे.सानिया मिर्झाने या कार्यक्रमाशी संबंधित अनेक व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. सानिया मिर्झा अनेक दिवसांपासून आपल्या मुलासह दुबईत राहत आहे.
सानिया मिर्झाची २००३ ते २०१३ या कालावधीत महिला टेनिस असोसिएशन म्हणजेच डब्लूटीएमध्ये एकेरी आणि दुहेरीत अव्वल भारतीय टेनिसपटू म्हणून आपले स्थान कायम राखले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी जगभरात प्रसिद्ध झालेल्या सानिया मिर्झाला २००६ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. हा बहुमान मिळवणारी ती सर्वात तरुण खेळाडू आहे.
SL/ML/SL
16 Nov. 2024
 
                             
                                     
                                    