काँग्रेसच्या आर्थिक धोरणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले
 
					
    सांगली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर रशियाच्या धर्तीवर जे आर्थिक मॉडेल काँग्रेसने अवलंबले ते चुकीचं ठरले, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचार सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ. सुरेश भाऊ खाडे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, भाजपाच्या नेत्या नीताताई केळकर, जनसुराज्याचे नेते समित कदम, आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे यांच्या सहित माहितीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसने आर्थिक नीती बदलण्यापेक्षा जाती आणि धर्मात भेद निर्माण केले, आणि त्यामुळे देशाची प्रगती होऊ शकली नव्हती, असं सांगून नितीन गडकरी पुढे म्हणाले, काँग्रेसने राज्यघटनेची ऐशी तैशी केली, तेच आता घटना घेऊन आमच्या विरोधात आग ओकत आहेत.
तुम्ही योग्य निर्णय घेऊन पक्ष योग्य व्यक्ती निवडला म्हणून पाणी आलं आणि रस्तेही झाले. माणूस हा जातीने नाही तर गुणाने ने मोठा असतो. जातीयता अस्पृश्यता समोर नष्ट झाली पाहिजे. आणि मानवतेच्या आधारावर सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे, असेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
नितीन गडकरी म्हणाले आतापर्यंत सांगली जिल्ह्याला 12 हजार कोटी रुपये दिलेत. आम्हाला निवडून दिले नसतं, आमचे राज्य आले नसते तर सांगली जिल्ह्यातील बारा हजार कोटीची कामे झाली असती का? तुमच्या जिल्ह्यात नेत्यांची कमी होती का ? केंद्रात काय सांगली जिल्ह्यातील कमी मंत्री झाले होते का ? मग टेंभू, म्हैसाळ योजना पूर्ण कां झाल्या नाहीत, असा सवाल ही नितीन गडकरी यांनी यावेळी उपस्थित केला.
ML/ML/PGB
16 Nov 2024
 
                             
                                     
                                    