पंतप्रधानांची भाषणे  म्हणजे  वाळवंटात धरण  बांधल्याचा  दावा

 पंतप्रधानांची भाषणे  म्हणजे  वाळवंटात धरण  बांधल्याचा  दावा

                                                                            
 

मुंबई दि १४– महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचारातील पंतप्रधानांची भाषणे ही वस्तुस्थितीचा विपर्यास असून वाळवंटात धरण बांधल्याचा दावा करण्यासारखे असल्याची उपरोधक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केली आहे.
 
गुंतवणूक, पायाभूत सुविधा तसेच उद्योग या विकासाच्या त्रीसुत्रीकडे भाजप सरकारने लक्ष केंद्रित केल्यामुळे परकीय गुंतवणुकीत आम्ही गेल्या
अडीच वर्षात उच्चांक केल्याच्या पंतप्रधानांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देत दुसरीकडे,  गेल्या ऑक्टोबर महिन्यात १. १८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेतून काढून घेतली एवढेच नव्हे तर परकीय गुंतवणूकदारांनी यंदाच्या वर्षात तब्बल २. ७९ लाख कोटी रुपयांचे समभाग (शेयर्स) विकले असल्याचे आकडेवारी सांगते, असेही गाडगीळ यांनी निदर्शनास आणले आहे.
 
उद्योग

देशातील गुंतवणुकीतील बराचसा हिस्सा पुण्यासाठी सरकार वळवत असल्यानी आय टी क्षेत्राची भरभराट होत आहे असा आभास पंतप्रधानांनी भाषणात निर्माण केला याचा उल्लेख करत याउलट पुण्यातील आय टी क्षेत्रात प्रगतीचा वेग मंदावत असून नोकरीच्या संधी कमी कमी होत असल्याची वास्तविकता गाडगीळ यांनी दाखवली आहे.
 
पायाभूत सुविधा

मेट्रो रेल या पायाभूत सुविधा क्षेत्रातील मुंबईतील प्रकल्पाचा सुरवातीचा अपेक्षित अंदाजे खर्च २४ हजार कोटी रुपयांवरून आता ३२ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. काँग्रेसने दिल्लीत अवघ्या ३ वर्षात मेट्रोचे जाळे उभारले. त्याउलट, मुंबईतील अंधेरी ते विधानभवन या मेट्रो मार्गास गतिमान भाजप सरकारमुळे झालेल्या  ८ वर्षाच्या विलंबाचा उल्लेख करायला पंतप्रधान विसरले याचे आश्चर्य वाटते असा टोमणाही  गाडगीळ यांनी लगावला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *