पूरनियंत्रणासाठी इंग्लंडमधील अभिनव प्रयोग

 पूरनियंत्रणासाठी इंग्लंडमधील अभिनव प्रयोग

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :समुद्राची वाढती पातळी, किनारपट्टीची धूप आणि हवामानातील बदल यामुळे निसर्गाचे संरक्षण करणे कठीण झाले आहे. अनेकदा समुद्राच्या पाण्यात भराव टाकून सागरी हद्दच बदलली जाते. पण यामुळे जगभर अतिवृष्टीदरम्यान पाण्याचा निचरा न झाल्याने शहरांना, गावांना पुराचे तडाखे बसले आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये एक प्रयोग राबवण्यात आला. यात समुद्राला जमीन परत देण्यात आली. म्हणजेच समुद्राच्या आजूबाजूला जी शेती किंवा गवती कुरणे आहेत ती मोकळी करण्यात आली. त्यासाठी जमीन मालकाला मोबदला देण्यात आला. या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम समोर आले. त्याठिकाणी तयार झालेल्या दलदलीमुळे मोठ्या प्रमाणात पुरावर नियंत्रण मिळवता आले.

‘वाइल्डफाऊल आणि वेटलँड ट्रस्ट’ या संस्थेच्या या प्रयोगाकडे सुरुवातीला नकारात्मक दृष्टीने पाहण्यात आले. काहींनी हा प्रयोग हास्यास्पद आहे म्हणून निंदादेखील केली. मात्र, त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. ज्या द्वीपकल्पाच्या परिसरात या प्रयोगाची सुरुवात करण्यात आली, त्या परिसरातील गावांमध्ये पूर आला नाही. एवढेच नाही तर दलदलीतून जाणारे मार्गही रहदारीयोग्य राहिले. आता त्याठिकाणी जुन्या पुराच्या भिंतीपेक्षा लक्षणीय उंच आणि गवताने झाकलेला तट आहे. संरक्षक आणि स्थानिक लोक यांच्यातील युतीमुळे प्रकल्पावरील सुरुवातीच्या आक्षेपांवर मात करण्यात मदत झाली आहे. संवर्धक ॲलिस लेव्हर या संपूर्ण प्रकल्पाची धुरा सांभाळत आहेत.

ML/ML/PGB 13 Nov 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *