मलबार हिलमधील मतदार पर्यावरण संवर्धनासाठी आग्रही
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मलबार हिलमधील मतदारांनी पर्यावरण संवर्धन आणि भटक्या प्राण्यांच्या कल्याणासाठी योजना राबविण्याचा आग्रह धरत नागरिकांचा जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे.
मलबार हिल परिसरातील ‘फ्रेंड्स ऑफ मलबार हिल’ या गटाने मतदारसंघातील नागरिकांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मलबार हिल मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने (उद्धव ठाकरे) भैरू चौधरी (जैन) यांना, तर महायुतीने भाजपचे आमदार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, विकासकामे, पुनर्विकास प्रकल्प याव्यतिरिक्त परिसरातील पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन याचबरोबर भटक्या प्राण्यांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशी एकमुखी मागणी या जाहीरनाम्यात केली आहे.
ML/ML/PGB
12 Nov 2024