वेबसिरिजमधून उलगडणार RBI ची ९० वर्षांची वाटचाल
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय बॅंकींग व्यवस्थेची शिखर bank असलेल्या रिझर्व्ह बँकेचा स्थापनेपासूनचा ९० वर्षांचा प्रवास आता वेबमालिकेच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. स्टार इंडियाकडून या वेबमालिकेची निर्मिती केली जाणार आहे.रिझर्व्ह बँकेचा ९० वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या या वेबमालिकेत, मध्यवर्ती बँकेचे ध्येय आणि धोरणे मांडण्यात येतील.
रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावानुसार, पाच भागांची वेबमालिका बनविली जाणार आहे. प्रत्येक भाग हा २५ ते ३० मिनिटांचा असेल. ही वेबमालिका राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्या अथवा ओटीटी मंचावर प्रसारित केली जाईल. रिझर्व्ह बँकेचा ९० वर्षांचा प्रवास या वेबमालिकेच्या माध्यमातून अधोरेखित केला जाईल.
बँकेच्या इतिहासातील मैलाचे टप्पे आणि विकासाचे टप्पेही दाखविण्यात येतील. बँकेचा प्रवास एका कथानकात गुंफला जाईल. त्यासोबतच तज्ज्ञांच्या मुलाखती आणि सामान्य नागरिकांना वित्तीय संकल्पना समजतील अशा पद्धतीने वेबमालिकेची मांडणी असेल.
SL/ ML/ SL
12 Nov. 2024