शिवसेना नेते राजन शिरोडकर यांचे निधन
मुंबई, दि. १२ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना मुंबईत शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे. शिवसेना नेते राजन शिरोडकर यांचे आज निधन झालं. मनसेच्या वाटचालीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत परतले होते. शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांमध्ये त्यांना मानणारे लोक होते. शिरोडकर यांच्या निधनामुळे शिवसेना, मनसेसह मुंबईतील राजकीय नेत्यांनी प्रचाराच कामे सोडून त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी आजची प्रचारसभा रद्द केली आहे.
राज ठाकरेंनी २००६ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मनसेची स्थापना केली. त्यावेळी राजन शिरोडकर राज यांच्या साथीला होते. मनसेच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यावेळी ते राज यांचे अतिशय जवळचे सहकारी होते. पण तीन वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतही राजन शिरोडकर यांनी काम केलं. शिवसेना उबाठाचे पुणे संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर हे राजन शिरोडकर यांचे पुत्र आहेत.
SL/ ML/ SL