अलविदा विस्तारा! विस्ताराचे शेवटचे फ्लाईट दिल्लीला रवाना

 अलविदा विस्तारा! विस्ताराचे शेवटचे फ्लाईट दिल्लीला रवाना

देशातील आघाडीची विमान वाहतूक कंपनी विस्ताराने सोमवारी ११ नोव्हेंबरला शेवटचे उड्डाण केले. एअर इंडियामध्ये विलीन होण्यापूर्वी विस्ताराचे शेवटचे फ्लाईट दिल्लीला रवाना झाले. विस्तारा ही विमान वाहतुक कंपनी मंगळवारी (ता.12) एअर इंडियामध्ये विलीन होणार आहे. 2013 मध्ये टाटा समूहाने सिंगापूर एअरलाइन्ससह संयुक्त उपक्रम करून, पुन्हा विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला आणि 9 जानेवारी 2015 रोजी विस्ताराने दिल्ली आणि मुंबई दरम्यान पहिले उड्डाण सुरु केले होते. मात्र, आता ९ वर्षांच्या वाटचालीनंतर विस्तारा ही कंपनी आपले कामकाज एअर इंडियामध्ये विलिन करणार आहे.एअर इंडिया आणि विस्ताराचे विलीनीकरण हे नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *