जेट एअरवेज होणार इतिहासजमा, मालमत्ता विक्रीतून विमान कंपनी खरेदीदाराला रक्कम मिळणार

एकेकाळी भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात वर्चस्व गाजवणारी जेट एअरवेज आता इतिहासजमा होणार आहे. ही विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सर्व शक्यता संपल्या आहेत. व्यापारी बँकांचे वाढते कर्ज फेडण्यात अपयश आल्यानंतर एप्रिल २०१९ पासून जेट एअरवेज बंदच आहे. प्रदीर्घ काळ रखडलेल्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेत या विमानसेवेसाठी यशस्वी बोली लावणाऱ्या जालान-कालरॉक संघाने जमा केलेले २०० कोटी रुपये जप्त करण्याचे आणि त्यांच्या १५० कोटी रुपयांच्या बँक हमीला देखील वठवण्याची स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील कर्जदात्यांना न्यायालयाने परवानगी दिली.