खलिस्तानींच्या मंदिरावरील हल्ल्यानंतर कॅनडाच्या नेत्यांना मंदिरात प्रवेश न देण्याचा हिंदूंचा पवित्रा
कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात एका हिंदू मंदिरावर नुकताच झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आता या हल्ल्याप्रकरणी कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदूने (CNCH) कडक पाऊल उचलले आहे. आता यापुढे कॅनडात उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांना हिंदू मंदिरांमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत खलिस्तानींवर कारवाई होत नाही आणि मंदिरांची सुरक्षा बळकट केली जात नाही, तोपर्यंत मंदिरांचा राजकीय हेतूने वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. खलिस्तानी-हिंदू वादाचे आणखी पडसाद उमटणार असल्याेचही बोलले जात आहे.