बांगलादेशात हिंदू धर्मगुरूंवर दाखल झाला देशद्रोहाचा गुन्हा
ढाका, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशातील आंदोलकांनी आरक्षण प्रश्नावर हिंसक आंदोलन करत शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावले आहे.या दरम्यान झालेल्या हिंसाचारात अनेक ठिकाणी हिंदू नागरीक आणि देवस्थांना लक्ष्य करण्यात आले होते. इथे आता नोबेल पुरस्कार विजेते महम्मद युनुस सत्तारुढ झाले असले तरीही हिंदू समाज विलक्षण अस्वस्थता आहे. बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रुमख मोहम्मद युनुस यांनी आता थेट हिंदूंना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. एका बाजूला देशात हिंदुंवरील हल्ले अद्याप थांबलेले नाहीत. मोहम्मद यूनुस सरकारला हिंदुंवरील हल्ले थांबवण्यात यश आले नाहीत. अशात ज्या लोकांनी हिंदूंवरील अत्याचारावर आवाज उठवला आहे अशा नेत्यांवर आणि धर्मगुरुंवर देशद्रोहाचे आरोप दाखल करण्यात आले आहेत.
बांगलादेशमधील यूनुस सरकार हिंदुंवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. बांगलादेश सनातन जागरण मंचचे नेता चिन्मय कृष्ण दास हे हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या नेत्यांमध्ये सर्वात आघाडीवर आहे.
बांगलादेशमधील हिंदू धर्माचे प्रमुख नेते चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांच्यासह अन्य लोकांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर २५ ऑक्टोबर रोजी चटगांव येथील न्यू मार्केटच्या चौकात बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाच्या वर भगवा झेंडा फडकवण्याचा आरोप आहे. चिन्मय कृष्णसह सर्व लोकांवर ३० ऑक्टोबर रोजी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. बांगलादेश मीडियने दिलेल्या वृत्तानुसार, चटगांव मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या एडिशनल डेप्युटी कमिशनर काझी मोहम्मद तारेक अजीक यांनी या प्रकरणी राजेश चौधरी आणि हृदय दास या दोघांना अटक केली आहे.
SL/ML/SL
2 Nov. 2024