LIC ने थकवला ६५ कोटींचा GST
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : LICसारख्या नावाजलेल्या सरकारी कंपनीकडून कोट्यवधींचा GST थकवला जाणे, ही सर्वसामान्य माणसासाठी निश्चितच धक्कादायक बाब आहे. सामान्य माणसाला GST साठी वारंवार तगादा लावणाऱ्या आणि कर थकल्यास तत्काळ कारवाई करणाऱ्या GST विभागाला LIC सारख्या मोठ्या कंपनीची कोट्यवधींची कर चुकवेगिरी फारच उशिरा लक्षात आल्याचे दिसत आहे. तब्बल ६ वर्षांनी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीला वस्तु व सेवाकर (जीएसटी) विभागाने ६५ कोटी रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस बजावली आहे.
झारखंड मधील २०१७-१८ या आर्थिक वर्षातील ही थकबाकी असून साडेसहा कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.एलआयसीच्या केवळ झारखंडमधील तत्कालिन व्यवहारासाठी काल ही नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये जीएसटीची रक्कम व त्यावरील साडेसहा कोटी रुपयांचा दंड व व्याज असे मिळून त्यांना एकंदरीत ६५ कोटी रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यावर एलआयसीकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
SL/ML/SL
31 Oct. 2024