विष्णू मनोहर बनवीत आहेत 24 तास डोसे

नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीच्या निमित्ताने नागपुरात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 24 तास डोसे बनविण्याचा नवीन रेकॉर्ड तयार करत आहेत. विष्णू मनोहर यांनी याआधी सुद्धा अनेक रेकॉर्ड खाद्यपदार्थ बनविण्याचे बनविले आहेत मात्र आता दिवाळीच्या निमित्ताने 24 तास डोसे बनविण्याचा रेकॉर्ड केला जात आहे.
नागपुरातील बजाजनगर येथील त्यांच्या विष्णु जी की रसोई येथे सकाळी 8 वाजता पासून याला सुरवात झाली असून उद्या सकाळी 10 वाजता पर्यंत हा कार्यक्रम सतत चालणार आहे. जवळपास 10 हजारच्या वर डोसें बनविले जाणार असून त्याचे वितरण याच ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना निःशुल्क पद्धतीने करण्यात येत आहे. तयार करण्यात आलेले डोसे नागरिकांना तसेच बालगोपाल, युवक, युवती, आबालवृद्ध, देिव्यांग यांना सुद्धा वाटप करण्यात येत आहेत. डोसे खाण्यासाठी खवय्यांनी सकाळपासूनच गर्दी केलेली दिसत आहे. विष्णू मनोहर यांचे डोसे खाण्याचा आस्वाद नागरिक घेत आहेत.
ML/ML/PGB
27 Oct 2024