राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची पहिली यादी जाहीर
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, अनिल देशमुख, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड या नेत्यांना पक्षानं पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवारांना तिकीट देण्यात आलेलं आहे. त्यामुळे बारामतीत यंदा काका विरुद्ध पुतण्या असा थेट सामना पाहायला मिळेल. लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झालेला आहे. त्यानंतर आता शरद पवारांनी पुतण्याविरोधात नातू युगेंद्र पवारांना संधी दिली आहे.महाविकास आघाडीची ही दुसरी यादी आहे. महाविकास आघाडीचा समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 85, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 85 जागा, तर काँग्रेसला 85 जागा असा हा फॉर्म्युला आहे. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आपली 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तिन्ही पक्षांना 270 जागा मिळणार आहेत. तर मित्रपक्षांना 18 जागांवर उमेदवार देता येणार आहेत.
SL/ML/SL
24 Oct. 2024