कोणत्याही स्थितीत बंडखोरी टाळा, अमित शहा यांच्या सक्त सूचना
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने महाराष्ट्र विधानसभेसाठी कसून तयारी केली असली तरीही गेल्या काही दिवसांत जागा वाटपावरून सुरु असलेल्या बंडखोरीमुळे भाजपही त्रस्त झाला आहे. याबाबतीत ठोस भूमिका घेण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिल्लीत एक बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. या बैठकीत अमित शहा यांनी कोणत्याही स्थितीत बंडखोरी टाळा, अमित शहा यांच्या सक्त सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे.
ज्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही असे इच्छूक बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी अमित शाह यांनी भाजप नेत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. नाराज झालेल्यांची सर्व प्रकारे समजूत काढा, असे अमित शाह यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर मतांची विभागणी आणि पक्षातील बंडखोरी रोखा, बंडखोर नेत्यांवर भाजपच्या नेत्यांनी नियंत्रण ठेवावे, अशा सूचना अमित शाह यांनी आज झालेल्या बैठकीतून राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
SL/ML/SL
24 Oct. 2024