दोन्ही शिवसेनेच्या याद्या जाहीर, शिवसैनिक समोरासमोर

 दोन्ही शिवसेनेच्या याद्या जाहीर, शिवसैनिक समोरासमोर

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर विधानसभेची पहिलीच निवडणूक होत आहे, त्यातील दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारी याद्या आज जाहीर झाल्या असून या निवडणुकीत काही जागांवर एकेकाळी शिवसैनिक म्हणून एकत्र काम केलेले जुने सहकारीच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध एकनाथ शिंदे यांचे गुरू असलेल्या दिवंगत आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांना उबाठा शिवसेना पक्षानं रिंगणात उतरवलं आहे.
लोकसभेला पराभूत झालेले राजन विचारे ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असून त्यांच्यासमोर भाजपाचे संजय केळकर आणि मनसेच्या अविनाश जाधव यांचं आव्हान असणार आहे.

माहीम यामध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर विरुद्ध उबाठा शिवसेनेचे महेश सावंत विरुद्ध मनसेचे अमित ठाकरे यांच्यातील तिरंगी लढत रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. डोंबिवलीमध्ये भाजपाच्या रवींद्र चव्हाणांविरोधात नुकतेच शिवसेनेतून उबाठा शिवसेनेत गेलेल्या दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी मिळाली आहे.
कोकणात महाडमध्ये शिवसेनेककडून भरत गोगावले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्यासमोर शिवसेना उबाठा पक्षाच्या स्नेहल जगताप यांचं आव्हान आहे.
रत्नागिरीत उदय सामंत यांच्यासमोर उबाठा शिवसेना पक्षाचे सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांचं आव्हान आहे .

राजापूर मतदारसंघात शिवसेना उबाठा पक्षाचे राजन साळवी यांच्यासमोर शिवसेनेचे किरण सामंत रिंगणात उतरले आहेत. तर सावंतवाडीमध्ये शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्याविरोधात भाजपातून नुकतेच शिवसेना उबाठा पक्षात आलेल्या राजन तेली यांना तिकीट देण्यात आलं आहे. सांगोल्यात शिवसेनेच्या शहाजी पाटील विरुद्ध शिवसेना उबाठा पक्षाचे दीपक साळुंखे आणि शेकापचे बाबासाहेब देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे.
सिल्लोडमध्ये शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सुरेश बनकर शिवसेना उबाठा पक्षाकडून रिंगणात उतरले आहेत . मालेगाव बाह्य मतदारसंघात दादाजी भुसे यांच्या विरोधात शिवसेना उबाठा पक्षाचे अद्वय हिरे निवडणूक लढवणार आहेत .

ML/ML/PGB 23 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *