बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

 बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणामध्ये तुरूंगात असलेल्या सचिन वाझेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. वाझेला कथित वसुली प्रकरणामध्ये जामीन मंजूर झाला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून वाझे तुरूंगात होते. त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यांच्यावर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा आणि धमकीचा आरोप आहे. तसेच मन्सुख हिरेन हत्या प्रकरण आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात ते आरोपी आहेत.अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत, त्यामुळे सचिन वाझे यांनीही जामिनासाठी याचिका केली होती. आता त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

सचिन वाझे हे अनेक महिने तुरुंगात होते. मे महिन्यात त्यांनी जामिनासाठी पुन्हा अर्ज केला होता, मात्र त्यांचा अर्ज पुन्हा एकदा फेटाळण्यात आला होता.

TR/ML/PGB
22 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *