समन्वयाची जबाबदारी आता बाळासाहेब थोरातांकडे
नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाविकास आघाडीत सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चेत समन्वयाची जबाबदारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय दिल्लीत उशीरा काल रात्री झालेल्या
काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ
नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार सतेज पाटील आदी उपस्थित होते. आतापर्यंत ही जबाबदारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
पार पाडत होते. दिल्लीत रात्री उशिरा पार पडलेल्या काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मविआतील दोन दिवस
थांबलेली जागा वाटपाची चर्चा
आजपासून पुन्हा सुरू होत आहे आता यापुढील चर्चेत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यानंतर महविकास आघाडीचे रखडलेले जागावाटप पुढे कसे जाते ते पाहावे लागेल.
ML/ML/PGB 22 Oct 2024