सेन्सेक्स-निफ्टीत विक्रीचा दबाव, परंतु बँकिंग शेअर्समधील खरेदीने शेवटच्या दिवशी दिला आधार

 सेन्सेक्स-निफ्टीत विक्रीचा दबाव, परंतु बँकिंग शेअर्समधील खरेदीने शेवटच्या दिवशी दिला आधार

सेन्सेक्स-निफ्टीत विक्रीचा दबाव, परंतु बँकिंग शेअर्समधील खरेदीने शेवटच्या दिवशी दिला आधार

मुंबई, दि. 19 (जितेश सावंत) : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या बँकिंग स्टॉक्समधील तेजीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला सलग तीन दिवस चाललेली घसरण थांबविण्यात मदत झाली. मात्र, ही वाढ साप्ताहिक तोटा भरून काढण्यासाठी पुरेशी नव्हती. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग तिसऱ्या आठवड्यात तोटा नोंदवला. ऑगस्ट 2023 नंतरचा हा त्यांचा साप्ताहिक तोटा सर्वात मोठा आहे.

या घसरणीचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात केलेली विक्री, यूएस व्याजदर कपातीच्या परिस्थितीबाबत अनिश्चितता,
महागाईत झालेली वाढ, तसेच सप्टेंबरमधील किरकोळ चलनवाढीचे आकडे गुंतवणूकदारांच्या अपेक्षेप्रमाणे आलेले नसल्याने गुंतवणूकदारांच्या लवकरच व्याजदरात कपात होण्याची अपेक्षांना बसलेला धक्का.

मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव वाढल्याने आणि जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणाऱ्या प्रोत्साहनात्मक उपायांनंतर चीनच्या दिशेने विदेशी गुंतवणूकदारानी उच्च परतावा मिळविण्यासाठी त्यांचे चीनकडे वळवलेले फंड. जागतिक भू-राजकीय तणाव (global geopolitical tensions),प्रतिकूल हवामान (adverse weather events),जागतिक अन्न आणि धातूंच्या किमतीत अलीकडेच झालेली वाढ(recent rise in global food and metal prices) ,Q2 तिमाहीचे कमजोर निकाल. या सगळ्याच्या परिणाम बाजारावर होताना दिसला.

Despite a rally in banking stocks on the last day of the week, which helped halt the three-day losing streak, the gains were not sufficient to offset the weekly losses. Both Sensex and Nifty recorded their third consecutive weekly loss, the largest since August 2023. The primary reasons for the downturn include heavy selling by foreign investors, uncertainty around US interest rate cuts, rising inflation, and disappointing retail inflation data.

Additionally, geopolitical tensions in the Middle East and increased global food and metal prices impacted the markets. However, Friday saw new investors buying at lower levels, offering a buying opportunity. In the coming week, attention will be on foreign investor flows, global cues, and crude oil prices.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) सातत्याने विक्री करताना दिसले.
ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत, FII ने ₹ 62,126 कोटी किमतीचे शेअर्स ऑफलोड केले आहेत—साडेचार वर्षांतील सर्वात मोठी विक्री, मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे सुरू झालेल्या ₹61,973 कोटींच्या आउटफ्लोनंतरची दुसऱ्या क्रमांकावरची ही विक्री आहे. 27 सप्टेंबरपासून, एकूण FII आउटफ्लो आधीच ₹73,000 कोटी ओलांडला आहे .
शुक्रवारी अमेरिकन बाजार डाऊ जोन्स विक्रमी शिखरावर बंद आला.

शुक्रवारी भारतीय बाजारात नवीन गुंतवणूकदारांनी मोट्या प्रमाणात खरेदी केल्याने बाजार वाढला. भारतीय बाजार अस्थिर असला तरी खालच्या स्तरावर खरेदीची उत्तम संधी आहे.

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष विदेशी गुंतवणूकदारांची भूमिका (FII inflows),जागतिक घडामोडी (global cues),कच्च्या तेलाच्या किमती, याकडे राहील.

Technical Analysis of Nifty:

Closing on Friday: Nifty closed at 24854.05 Key Support Levels:-24845-24823.15,24,817-24,789-24,754-24736-24724-24717-24,686-24,631-24,619-24,587-24,530.9-24,502-24488-24,449-24,433-24,414-24,367.5-24,331-24,281-24,240- 24,193 Breaking these could lead Nifty to further lower levels.

Resistance Levels: 24,880—24904-24950- 24993-25031-25078-25101-25152-25199-25235.9 -25269-25303- 25338—25357-25427- 25470-25497-25565- 25692 and 26051

These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.

Author Information:

लेखक: शेअरबाजार आणि सायबरकायदा तज्ञ आहेत

ईमेल: jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर): @JiteshSawant
फेसबुक पेज: 
Jitesh Sawant

GS/ML/PGB
19 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *