माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या आयुष्यावर येतोय चित्रपट

 माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या आयुष्यावर येतोय चित्रपट

मुंबई:सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा विधानसभेत निवडून आणलेले दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या आयुष्यावर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा ट्रेलर आता समोर आलाय.

काही दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोरंजनविश्वात राजकीय आवाज घुमताना दिसतोय. राजकीय स्पर्श असलेल्या सिने-नाट्याचा धडाका आता मोठ्या पडद्यावर होतोय. आता आणखी एका ज्येष्ठ नेत्याच्या आयुष्यावर बायोपिक येत हे. ‘कर्मयोगी आबासाहेब’ असं या सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा गणपतराव देशमुख यांच्या आयुष्यावर बेतला आहे.

‘कर्मयोगी आबासाहेब’ या सिनेमातून गणपतराव देशमुख यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रस्थापितांच्या राजकारणात एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षाच्या निशाणीवर तब्बल अकरावेळा निवडून येण्याची किमया त्यांनी साधली होती. २०१४ च्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघात उमेदवारी लढविण्याची त्यांची बिलकुल इच्छा नव्हती. जनसामान्यांचे प्रेम आणि कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी पुन्हा निवडणूक लढविली होती. शिवसेनेच्या शहाजीबापू पाटील यांचा २५ हजाराहून अधिक मताधिक्यानं पराभवही केला होता. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा अकरावेळा निवडून येण्याच्या राष्ट्रीय विक्रमाची त्यांनी यावेळी बरोबरी केली होती. चार पिढ्यातील मतदारांशी नाळ जोडलेले ते आदर्श लोकप्रतिनिधी होते. त्यांचं हे आयुष्य सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
साधी राहणी व स्वच्छ प्रतिमेमुळं राजकारणात त दीपस्तंभासारखे देशमुख टिकून होते. ते पहिल्यांदा १९६२ साली आमदार म्हणून विधानसभेत गेले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा वगळता अकरावेळा सांगोल्यातून निवडून आले.

गणपतराव हे दोनवेळा मंत्री झाले होते. मंत्रिपद गेल्या गेल्या त्यांनी सरकारी गाडीचा त्याग केला होता. आमदार असतानाही ते एसटीनं प्रवास करायचे. एसटीने प्रवास करणारे आमदार त्यांना ओळखलं याजचं.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *