आता रेल्वेचं तिकीट बुकींग ६० दिवस आधी करता येणार
भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता प्रवासाच्या केवळ 60 दिवस आधीच तिकीट आरक्षण करता येणार आहे. सध्या हा कालावधी 120 दिवसांचा होता, परंतु 1 नोव्हेंबर 2024 पासून हा नियम लागू होणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन अधिक सुलभ होईल, तर तिकीट रद्द होण्याच्या समस्या देखील कमी होतील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे; परंतु प्रवाशांसाठी हा निर्णय किती योग्य ठरेल हे पाहण्यासारखे आहे.