महिलेची मांत्रिकाच्या नादाला लागून मोठी फसवणूक
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एका महिलेने मांत्रिकाच्या नादाला लागून आपलं मोठ नुकसान करुन घेतलं. मांत्रिकामुळे या महिलेची मोठी फसवणूक झाली. मांत्रिकाने महिलेला आमिष दाखवलं होतं. मांत्रिकाने महिलेला तिचा मुलगा मिळवून देण्याचा शब्द दिला होता. या महिलेचा घटस्फोट झाला आहे. तिचा मुलगा पित्यासोबत राहत आहे. मुलाने आपल्यासोबत रहावं अशी महिलेची इच्छा होती. तुझा मुलगा तुझ्याकडे परत येईल असा मांत्रिकाने या महिलेला आश्वासन दिलं होतं. महिलेने यासाठी कायदेशीर मदत घेण्याऐवजी तांत्रिकाचा आधार घेतला. उत्तराखंडच्या डेहराडूनमधील हे प्रकरण आहे.
मुलगा परत मिळवून देतो सांगितलं, तिथूनच फसवणुकीचा सर्व खेळ सुरु झाला. महिलेला सोशल मीडियावर मांत्रिकाचा नंबर मिळालेला. महिलेने तांत्रिकाशी संपर्क साधलेला. तांत्रिकाने महिलेच सगळ म्हणण ऐकून घेतलं. मी तुझी समस्या सोडवू शकतो, पण त्याआधी तुला 5500 रुपये जमा करावे लागतील असं तिला सांगितलं. महिलेने जे सांगितलं ते केलं. त्यानंतर मांत्रिकाने महिलेला असं फसवलं की, तिच्याकडून 6 लाख 8 हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झालीय हे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांची मदत घेतली.
PGB/ML/PGB
16 Oct 2024