छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या १३ वर्षांच्या मुलीवर शिक्षकाचा अत्याचार

छत्रपती संभाजीनगरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या 13 वर्षीय मुलीवर तिच्याच प्रशिक्षकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी शिक्षक, शिवाजी जगन्नाथ, याने आपल्या पदाचा गैरवापर करत मुलीवर बलात्कार केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपीवर वेदांतनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे राज्यात महिलांवरील अत्याचाराचे गंभीर स्वरूप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.