महायुतीने साधली संधी , सात जण विधानपरिषदेवर नियुक्त

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यपाल नियुक्तीचे घोंगडे मुंबई उच्च न्यायालयात भिजत पडले असतानाच कायद्याच्या कचाट्यातून संधी साधत महायुती सरकारने आज आपल्या सात लोकांना राज्य विधानपरिषदेवर राज्यपल नियुक्त सदस्य म्हणून नेमून घेतले. या विरोधात शिवसेना उबाठा ने न्यायालयात तातडीने दाद मागूनही त्याचा काही उपयोग झाला नाही.

काल संध्याकाळी आपल्या सात लोकांची नावे राज्यपालांकडे पाठवून रात्री उशिरा त्यांना मान्यता मिळवण्यात आली आणि आज दुपारी १२ वाजता राज्यपाल नामनियुक्त सात विधान परिषद सदस्यांचा शपथविधी देखील पूर्ण झाला. या शपथविधीला तातडीने स्थगिती देण्यासाठी शिवसेना ऊबाठा गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र न्यायालयाने ही विनंती अमान्य केली आणि महायुतीचे सात जण विधानपरिषदेवर नियुक्त करण्यात आले.

आज दुपारी बारा वाजता विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी
राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली.विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम होईल. आज शपथ दिलेल्या असलेल्या नामनियुक्त सदस्यांची नावे पुढीप्रमाणे –

१) चित्रा किशोर वाघ

२) विक्रांत पाटील

३) धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड

४) पंकज छगन भुजबळ

५) इद्रिस इलियास नाईकवाडी

६) हेमंत श्रीराम पाटील

७) डॉ मनीषा कायंदे.

ML/ML/PGB 15 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *