मुलीची छेड. मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :एका मुलीची छेड काढणाऱ्या कंडक्टरला तिच्या मैत्रिणींनी चांगलंच धुतलंय. दापोली-पंचंनदी बसमध्ये चढलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेडछाड केल्यामुळे बसमधील इतर विद्यार्थिनींनी आक्रमक पवित्रा घेत बस कंडक्टरची धुलाई केली आहे. या विद्यार्थींपैकी एका मुलीने चक्क चप्पल हाती घेऊन कंडक्टरला चांगलंच सुनावल आणि धोपटलंही आहे. मुलींचा हा रौद्रअवतार पाहून बसच्या आजूबाजूला चांगलीच गर्दी जमली होती, बस थांबवून कंडक्टरला चोप दिल्यामुळे दाभोळमध्ये ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये मर्दानी बनून मुलीने कंडक्टरला चांगलाच धडा शिकवलाय. तसेच, याप्रकरणी कंडक्टरची दाभोळ पोलिसात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
PGB/ML/PGB 15 Oct 2024