पास्टर ज्योत्स्ना जाधव यांना उत्कृष्ट धर्मप्रसारक म्हणून केले पुरस्कृत!

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युनाईट होप फाऊंडेशनने पास्टर ज्योत्स्ना जाधव यांना उत्कृष्ट धर्मप्रसारक म्हणून पुरस्कृत केले आहे. ख्रिश्चन धर्माच्या वचनाचा प्रसार करण्यास पास्टर ज्योत्स्ना जाधव यांनी वेळोवेळी एक मुख्य धर्मोपदेशक म्हणून भूमिका बजावली आहे. मानवी जीवनात परमेश्वराबद्दल प्रेम बाळगून, ख्रिस्ताच्या आदर्श जीवनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा ख्रिस्ती मनुष्य प्रयत्न करत असतो, याच प्रयत्नांसाठी प्रेरणा देण्याचे काम पास्टर म्हणजेच एक मुख्य धर्मोपदेशक म्हणून डॉ. ज्योत्स्ना जाधव यांनी वेळोवेळी केले आहे.
येशू ख्रिस्ताच्या धर्मप्रसारासाठी ऑनलाईन जी.पे. तथा वेगवेगळ्या माध्यमातून पास्टर डॉ. ज्योत्स्ना जाधव देणगी उभारण्याचे काम करत असतात. प्रार्थना सभा आणि सम्मेलन भरवून ख्रिश्चन धर्मप्रसार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पास्टर डॉ. ज्योत्स्ना जाधव स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरून येशू ख्रिस्ताच्या शिकवणीतून जीवन कसे जगायचे याची प्रेरणा देत असतात. परमेश्वर आणि त्याचे वचन सर्व लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी मुख्य धर्मोपदेशक म्हणून Jesus India TV आणि Jesus India Prayer TV सारख्या प्रसिद्ध धर्मप्रसार युट्युब चॅनेल वरून पास्टर डॉ. ज्योत्स्ना जाधव यांनी लोकांना धार्मिक शिक्षण दिले आहे.
ईश्वरी प्रार्थनेच्या व वचनाच्या सेवेत तत्पर राहण्याचा संदेश देणाऱ्या पास्टर डॉ. ज्योत्स्ना जाधव यांना युनाईट होप फाऊंडेशनने उत्कृष्ट धर्मप्रसारक म्हणून पुरस्कृत केल्याने धार्मिक संस्कारांची शिकवण देण्यास आणि बायबल हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी एक उत्कृष्ट धर्मोपदेशक ख्रिश्चन धर्माला लाभला आहे.
Dr. Jyotsana Jadhav YT Channel:-
https://youtube.com/@drjyotsnajadhavministries?si=SUYfPoFQbZ7VXjoE
Jesus India TV:- https://youtu.be/okt-sGnDWlk?si=pf32APs8sImjuv5Z
Jesus India Prayer TV :-
https://youtu.be/cV19oGrKnzA?si=iG6JylriaotTy3l3
ML/ML/PGB
15 Oct 2024