नात्याला काळिमा, चार वर्षांच्या चिमुरडीवर मामाकडून लैंगिक अत्याचार

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार झाल्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे खळबळ उडाली असताना अशीच एक धक्कादायक घटना घोरपडीमध्ये घडली आहे. घोरपडी गावातील एका झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर मानलेल्या मामाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी पहाटे याप्रकरणी गुन्हा दाखल दाखल झाला आहे. मुंढवा पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
TR/ML/PGB
14 Oct 2024