नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पाच हजारांचे सानुग्रह अनुदान
सांगली,दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळी आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, प्रत्येक नोंदणीकृत जिवंत बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत उचांकी असे 80 निर्णय घेण्यात आले आहेत. कामगार विभाग मार्फत पत्रकार आणि विक्रेत्यासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले आहेत, त्याच बरोबर शिंपी, वाणी, गवळी, कुंभार, लोहार समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे, असे सांगून मंत्री खाडे पुढे म्हणाले, मिरज तालुक्यातील बेडग रोड वरील रेल्वे उड्डाणपूल साठी केंद्र सरकारने 42 कोटी मंजूर असून या कामाचे टेंडर काढण्यात आले आहे, लवकर हे उड्डाणपूल बांधला जाईल, अशी माहिती मंत्री सुरेश खाडे यांनी यावेळी दिली.
ML/ML/SL
11 Oct. 2024