फक्त या ७ लोकांना Instagram वर फॉलो करायचे रतन टाटा
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध उद्योजक आणि खऱ्या अर्थाने भारताचे रत्न असलेले रतन टाटा यांच्या निधनाने अवघा देश शोकाकूल झाला आहे. लाखो लोकांना रोजगार देणारे, अनेकांना प्रेरणा देणारे, सामाजिक कार्यातून अनेकांच्या आयुष्य उभी करणारे टाटा हे सचोटीच्या उद्यमशीलतेचे मूर्तीमंत रूप होते. जगभरातील करोडो लोक त्यांना सोशल मिडियावर फॉलो करत. मात्र रतन टाटा फक्त जगातील सात लोकांनांच सोशल मिडियावर Follow करत होते.
रतन टाटा स्वत: फक्त सात जणांना फॉलो करायचे. या सात जणांमध्ये दोन फक्त दोन भारतीय व्यक्ती आहेत. एक महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा होय. दुसरी भारतीय व्यक्ती म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होय. रतन टाटा ज्या लोकांना फॉलो करायचे त्यापैकी दोन जण परदेशातील आहेत. त्यापैकी एक अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, दुसरी सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली श्येन लूंग हे आहेत.
टाटा समूहातून निवृत्ती घेतल्यानंतर देखील ते विविध कामात सक्रीय असायचे. रतन टाटा अनेकदा सोशल मीडियावरून लोकांना आवाहन करायचे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी १८ मे रोजी रतन टाटांनी मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. पावसाळ्यात श्वान गाड्यांच्या खाली जाऊन बसतात. तेव्हा गाडी सुरू करण्याआधी एकदा चेक करा की खाली एखादे श्वान आहे का? जेणेकरून गाडी सुरू केल्यानंतर त्याला कोणतीही इजा होणार नाही. अनेकदा रतन टाटांच्या नावावरून चुकीच्या बातम्या किंवा अफवा पसरवल्या जायच्या, अशा वृत्ताबाबत ते तातडीने लोकांना अलर्ट करायचे.
SL/ML/SL
10 Oct. 2024