या केबल ब्रिजमुळे पुणे – मुंबई प्रवासाचा कालावधी 25 मिनिटांनी होणार कमी
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
मुंबई आणि पुणे या राज्यातील दोन प्रमुख महानगरांतील प्रवासाचे तास कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.यातीलच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे पुणे- मुंबई दरम्यान खोपोली जवळ उभारला जाणारा केबल ब्रिज.यामुळे या दोन शहरांतील प्रवासाचा वेळ अर्धातासाने कमी होणार आहे. मुंबई-पुणे शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी खोपोली येथे हा देशातील सर्वात मोठा उंच केबल ब्रिज तयार केला जात आहे. यालाच मिसिंग लिंक प्रॉजेक्ट असेही म्हटले जात आहे. दोन डोंगरांदरम्यान तयार होणारा केबल ब्रिज जमिनीपासून 183 मीटर उंच आहे.
या पुलाचे काम आता 80 टक्के पूर्ण झाले आहे. सध्या खोपोली एग्झीट ते सिंहगड इंस्टिट्यूट दरम्यान अंतर 19 किमी आहे. हा पूल पूर्ण झाल्यावर हे अंतर केवळ 13.3 किमी राहणार आहे. यामुळे सहा किलोमीटर अंतर दोन्ही शहरांचे कमी होणार आहे. जून 2025 सुरु होणाऱ्या मिसिंग लिंक प्रॉजेक्टमुळे दोन्ही शहरांमधील अंतरही कमी होणार आहेत.
मिसिंग लिंक प्रॉजेक्ट हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) करण्यात येत आहे. त्यासाठी 13.3 किमी लांब मार्ग बनवला जात आहे. त्यात दोन टनल आणि दोन केबल ब्रिज असणार आहे. 13.33 किमीपैकी 11 किमी लांब टनल आणि 2 किमीचा केबल ब्रिज असणार आहे. एमएसआरडीसीनुसार दोन्ही टनल खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या हे टनल फिनिशिंग करण्याचे काम सुरु आहे.
SL/ML/SL
9 Oct. 2024