हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढविणार, जयंत पाटील यांनी केली घोषणा

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज ७ ऑक्टोबरला राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट मिळाल्याचे दिसून येत आहे. कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayan Patil) यांनी इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटील यांनी हाती घ्यावं, असं वक्तव्य केलंय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीबाबत सुतोवाच केले आहे. त्यामुळे एकप्रकारे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.