हा प्रतिष्ठित चषक जिंकण्याचं आमचं स्वप्न आहे : हरमनप्रीत कौर
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, “हा प्रतिष्ठित चषक जिंकण्याचं आमचं स्वप्न आहे आणि ती क्षमता सुद्धा आहे. 2020 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत आम्ही अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.
“मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत भरलेल्या विश्वचषक स्पर्धेत आम्हाला सेमी फायनलला थोडक्यात हार पत्करावी लागली. गेल्या काही विश्वचषकातील सातत्यपूर्ण कामगिरी हेच दर्शवते की सगळ्याच प्रतिष्ठित स्पर्धा जिंकण्याची क्षमता भारतीय संघात आहे,” हरमनप्रीत म्हणाली.
‘अ’ गटात असलेल्या भारतासमोर ऑस्ट्रेलियासोबतच न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. तर ‘ब’ गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि स्कॉटलंड या संघांचा समावेश आहे.
यावेळी महिला टी – 20 विजेतीपदाची रक्कम ही पुरुष टी – 20 विजेतीपदाएवढीच असणार असल्याची ऐतिहासिक घोषणा आयसीसीने केली आहे.
PGB/ML/PGB
3 Oct 2024