बदलापुर प्रकरणी शाळा संस्थापक, सचिवाला अखेर अटक

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूर बलात्कार प्रकरणात सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलेले त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात गुन्हा घडल्यापासून सातत्याने पोलिसांना हुलकावणी देत असलेले संस्थेचे चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना आज पोलिसांनी अटक केली आहेत. हे दोघे कर्जत येथे लपून बसले होते. तिथेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
या दोन्ही आरोपींना आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टात युक्तिवाद झाला. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत एका प्रकरणात जामीन मंजूर केला. तर दुसऱ्या एका प्रकरणात कोर्टाने आरोपींना अटक करण्यासाठी परवानगी दिली. दरम्यान कोर्टाने दोन्ही आरोपींना 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. तर दुसऱ्या एका गुन्ह्यात कोर्टात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी परवानगी मागितली. कोर्टाने यावेळी पोलिसांची भूमिका ऐकून अटकेसाठी परवानगी दिली.आरोपींनी तपास कार्यात सहकार्य केले नाही. यामुळे दोन्ही आरोपींना दिवसांची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.