अटल सेतूवरून माटुंग्यातील व्यापाऱ्याची आत्महत्या
अटल सेतूवरून उडी मारत जीव देण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. बुधवारी आणखी एका व्यावसायिकाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. फिलिप हितेश शाह असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. बुधवारी पहाटे या व्यावसायिकाने अटल सेतूवरुन उडी मारून आपले जीवन संपवले. फिलिप यांनी आपली कार पुलावर थांबवली आणि समुद्रात उडी घेतली. नवी मुंबई पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन मृतदेह शोधून काढला.