अमेरिकेने सिरीयावर केला एअरस्ट्राइक, ३७ दहशतवाद्यांचा खात्मा

अमेरिकेने सीरियातील ISIS आणि अल कायदाशी संबंधित दहशतवादी गटांच्या लक्ष्यांवर हल्ला केला. यामध्ये ३७ दहशतवादी मारले गेले आहेत. अमेरिकन सैन्याकडून दोन वेगवेगळ्या दिवशी सीरियामध्ये हल्ले करण्यात आले आहेत. यूएस सेंट्रल कमांडच्या म्हणण्यानुसार, १६ सप्टेंबर रोजी मध्य सीरियामध्ये ISIS च्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करण्यात आला. यामध्ये २८ दहशतवादी मारले गेले.यानंतर २४ सप्टेंबरला अमेरिकन लष्कराने उत्तर-पश्चिम सीरियावर हल्ला केला, ज्यामध्ये अल कायदा गटाचे ९ दहशतवादी मारले गेले. अमेरिकेने केलेल्या दोन हल्ल्यात अल कायदा संघटनेशी संबंधित हुर्रास अल-दिनचा टॉप कमांडर ‘अब्द-अल-रौफ’ मारला गेला आहे, अशी माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे. त्याने सीरियातील लष्करी कारवायांवर देखरेख ठेवली होती.