PMRDA च्या हद्दीतील या नद्या होणार प्रदूषण मुक्त

 PMRDA च्या हद्दीतील या नद्या होणार प्रदूषण मुक्त

.पुणे, दि. २९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : नदीच्या काठावर वसलेले एक पर्यावरणपूरक शहर अशी काही दशकांपूर्वी ओळख असलेल्या पुणे शहर आणि परिसरातील नद्यांचे अती प्रदुषणामुळे नाल्यात रुपांतर झाले आहे. यावर उपाय म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या चार नद्यांवर प्रदूषण नियंत्रण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत प्रदूषित झालेली नदी स्वच्छ करणे आणि नदी प्रदूषण होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि राष्ट्रीय नदी संवर्धन प्राधिकरण (नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन डिक्टोरेट एनआरसीडी) यांनी १,९६७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे लवकरच या चारही नद्या प्रदुषणमुक्त होऊन स्वच्छ आणि सुंदर स्वरूपात पहायला मिळणार आहे. पीएमआरडीए’ हद्दीतून मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या नद्या जातात. मात्र, वाढते नागरिकरण, औद्योगिकीकरण यामुळे या नद्यांच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे.

पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिकेसह लगतच्या गावांतील ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीतील मैला, सांडपाणी यांवर प्रक्रिया करण्याचे धोरण उशिरा स्वीकारले. अद्यापही येथील सांडपाणी अनेकदा प्रक्रिया न करताच नद्यांमध्ये सोडले जाते. औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषित पाणीही नद्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. यामुळे ‘पीएमआरडीए’ प्रशासनाने या नद्या स्वच्छ करून प्रदूषणमुक्त करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी १,९६७ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ४० टक्के निधी राज्य सरकार, तर ६० टक्के निधी ‘एनआरसीडी’ देणार आहे. सध्या मुळा-मुठा नद्यांचे स्वच्छतेचे काम सुरू आहे. तर, इतर दोन्ही नद्यांच्या ‘डीपीआर’चे काम सुरू आहे.

अपेक्षित कामे

मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) उभारणे

नद्यांचे प्रदूषित पाणी एकत्रित संकलित करण्यासाठी मल वाहिन्या टाकणे

जलपर्णी निर्मूलन

घन कचरा व्यवस्थापन

SL/ ML/ SL

29 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *