शिगेरू इशिबा जपानचे नवे पंतप्रधान
जपानचे संरक्षण मंत्री असलेले शिगेरू इशिबा आता देशाचे नवे पंतप्रधान होणारआहेत. त्यांनी आज लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) निवडणुकीत विजय मिळवला. 1 ऑक्टोबर रोजी संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर ते पदभार स्वीकारतील.
वास्तविक, जपानमध्ये सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षाची पंतप्रधान म्हणून निवड केली जाते. संसदेच्या दोन्ही सभागृहांत एलडीपी पक्षाचे बहुमत आहे. अशा परिस्थितीत पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झालेले इशिबा आता जुलै 2025 पर्यंत पंतप्रधानपदावर राहतील. यानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
67 वर्षीय इशिबा यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी साने तकायची यांचा 21 मतांच्या फरकाने पराभव केला. इशिबा यांना पक्षाच्या सदस्यांकडून 215 मते मिळाली. इशिबा यांनी यापूर्वी चार वेळा पक्ष नेतृत्वासाठी निवडणूक लढवली आहे. 2012 मध्येही ते शिंजो आबे यांच्या विरोधात उभे राहिले होते, मात्र त्यांना प्रत्येक वेळी पराभवाला सामोरे जावे लागले होते.
निवडणूक जिंकल्यानंतर इशिबा म्हणाले, “आता पक्ष नव्याने उभा राहील आणि लोकांचा विश्वास जिंकेल. मी माझ्या कार्यकाळात देशातील जनतेशी खरे बोलेन. देश सुरक्षित आणि समृद्ध करण्यासाठी मी काम करत राहीन.”
शिबा हे जपानचे संरक्षण आणि कृषी मंत्री राहिले आहेत. 1986 मध्ये वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी पहिली निवडणूक जिंकली. त्यानंतर ते जपानच्या संसदेचे सर्वात तरुण सदस्य बनले. यावेळी त्यांच्या प्रचारात, इशिबा यांनी देशातील अणुऊर्जा प्रकल्प हळूहळू बंद करण्याचे आश्वासन दिले आहे.याशिवाय त्यांनी चीन आणि उत्तर कोरियासारख्या धोक्यांना तोंड देण्यासाठी आशियामध्ये नाटो तयार करण्याबाबतही बोलले आहे
SL /ML/SL
27 Sept. 2024