सीना कोळेगाव धरण ओव्हरफ्लो- सतरा दरवाजे उघडले
धाराशिव दि २७(एमएमसी न्यूज नेटवर्क) : परंडा तालुक्यातील साडेपाच टीएमसीचे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण सीना कोळेगाव सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरला आहे .गुरुवार दिनांक 26 – 27 सप्टेंबर रोजी धरणाचे एकूण 17 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू केला आहे . त्यामुळे प्रशासनाकडून प्रकल्प परिसर , नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .एकूण 21 दरवाजा पैकी 17 दरवाजातून अंदाजे 25 ते 30 हजार क्युसेसने पाणी खाली नदी पात्रात सोडण्यात आली आहे .
परंडा तालुक्यातील महत्त्वाचा असलेला सिना -कोळेगाव प्रकल्प 100 टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत . साडेपाच टीएमसी पाणी क्षमता असलेला हा प्रकल्प निर्मितीपासून पूर्ण क्षमतेने भरण्याची ही ८ वी वेळ आहे हे धरण सण २०२० ते २०२१ व २०२२ असे सलग तीन वेळा हे धरण भरल्याने हॅट्रिक साधली होती .कोळेगाव या धरणाची पाणी साठवण क्षमता १५० . ४९ दलघमी (साडेपाच टीएमसी ) आहे . १०४ . ३५ दलघमी पाणीसाठा वापरता येतो तर या धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ७६ . १८ दलघमी आहे . धरणाची पूर्ण जलाशय पातळी ५०२ . ८०० मीटर तर माथा पातळी ५०८ मीटर आहे .
या सिना – कोळेगाव प्रकल्पाच्या पाण्यावर परंडा तालुक्यातील ८ हजार ७०० हेक्टर , करमाळा तालुक्यातील ३ हजार ४०० हेक्टर असे एकूण १२ हजार १०० हेक्टर क्षेत्र भिजणारे क्षेत्र आहे . धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला असून यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आता उसाची लागवड होऊ शकते .
ML/ ML/ SL
27 Sept 2024