बायकोच्या बिकनीसाठी काय पण! फक्त ५० मिलियन खर्च करून दुबईतील कोट्याधीशाने विकत घेतले खाजगी बेट

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुबईत राहणाऱ्या एका ब्रिटीश महिलेसाठी तिच्या पतीने, तिला समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी घालून सुरक्षित वाटावे म्हणून 50 मिलियन डाॅलर्सचे खाजगी बेट विकत घेतले आहे. आपल्या अब्जाधीश पतीने बीचवर बिकिनीमघ्ये पाहण्यासाठी एक संपूर्ण बेट खरेदी केल्याचा दावा दुबईतील या गृहिणीने केला आहे. २६ वर्षांच्या सौदी अल हिने इन्स्टाग्रामवर या खासगी बेटाचा व्हिडिओ शेअर करत तिने असे सांगितले आहे.२६ वर्षांची सौदी अल नदाक ही दुबईतील व्यावसायिक जमाल अल नदाक याची पत्नी आहे. ती मुळची ब्रिटिश आहे. अतिश्रीमंत गृहिणी असण्याबरोबरच सौदी ही एक इंफ्लुएंसर म्हणूनही ओळखली जाते. तिच्या इन्स्टा आणि टिकटॉक अकाउंटवरून तिची हायप्रोफाइल लाईफस्टाइल शेअर करत असते.
PGB/ML/PGB
26 Sep 2024